Friday, March 29, 2024
Homeराजकारणशेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे ९४ व्या वर्षी निधन,...

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे ९४ व्या वर्षी निधन, ५४ वर्षे होते आमदार

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे आज रात्री ९:१५ च्या सुमारास सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले ते ९४ वर्षांचे होते.

देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा विक्रमी विजय मिळविला आहे. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते.

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी ९४ हजार ३७४ मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव केला. 

देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२ च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५ चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय