Thursday, August 11, 2022
Homeजिल्हादिव्यांग बांधवांच्या पिवळ्या रेशनकार्डसाठी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर थेट पुरवठा...

दिव्यांग बांधवांच्या पिवळ्या रेशनकार्डसाठी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर थेट पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या केबिनमध्ये…

spot_imgspot_imgspot_imgspot_img

मुंबई: दिव्यांग लाभार्थ्यांना पिवळी शिधापत्रिका देण्याचे शासन आदेश असताना मागणी करूनही अ ब क ड चे विभागीय अधिकारी आणि शहर पुरवठा कार्यालयाकडून चालढकल करण्यात येत होती. 

लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटना याबद्दल गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करत असून हा विषय माजी आमदार नरसय्या आडम यांनी थेट मंत्रालयापर्यंत नेला आणि नागरी व पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्यासमोर कैफियत मांडली.

ब्रेकींग : सोयाबीन दरात मोठी घसरण, 27 सप्टेंबर रोजी किसान सभेची आंदोलनाची घोषणा

यावर ना.भुजबळ यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांना दूरध्वनी वरून दिव्यांग लाभार्थ्यांना पिवळी शिधापत्रिका देण्याचे आदेश दिले.

ही बातमी ऐकून दिव्यांग बांधवांनी आनंद व्यक्त करत लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटना आणि माजी आमदार नरसय्या आडम यांचे आभार मानले. 

हेही वाचा ! प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !

पिवळ्या शिधापत्रिकेसाठी संघटनेचे अध्यक्ष बाबूलाल फनिबंद, सचिव इलियास सिद्दीकी, उपाध्यक्ष आसिफ पठाण आणि कोषाध्यक्ष अकिल शेख यांनी विशेष प्रयत्न केले. याकामी सिटुचे महासचिव ऍड. एम. एच. शेख, सचिव युसूफ मेजर यांचे मार्गदर्शन लाभले.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय