Sunday, December 8, 2024
Homeजिल्हाकोरोना काळातील घरपट्टी, पाणीपट्टी व जागा भोगवटादारांचे थकीत कर माफ करा -...

कोरोना काळातील घरपट्टी, पाणीपट्टी व जागा भोगवटादारांचे थकीत कर माफ करा – नगरसेवक कृष्णा मापारी

पैठण (औरंगाबाद) : पैठण नगर परिषद प्रशासन व सर्वपक्षीय नगरसेवकांनी  एकञीत येऊन कोरोना काळातील घरपट्टी, नळपट्टी व जागा भोगवटा दारांचे कर माफ करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती शिवसेना नगरसेवक कृष्णा मापारी यांनी दिली आहे.

गेल्या दिड वर्षापासून कोरोना महामारीमुळे जनसामान्य नागरीकांचे आर्थिक चक्र कोडमळलयामुळे त्यांच्या कुंंटूबियावर उपासमारीची वेळ आली आहे. व सातत्याने लाॅकडाऊनमुळे व्यापारपेठ ठप्प झाल्याने विविध दूकाने,हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा रोजगारही बंद झाला आहे. तसेच व्यापारी व सर्वसामान्य नागरीक आर्थिक दृष्ट्या व कर्जबाजारी पणामुळे हताश झालेला आहे,या सर्व पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकञीत येऊन दोन वर्षाची घरपट्टी, नळपट्टी व न.प. मालकीच्या जागेवरील भोगवटादार नागरीकांचे कर माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

जनसेवेचा वसा घेतलेल्या ११ प्रभागातील व स्विकृत सदस्य असलेल्या नगरसेवकांनी पक्षीय मतभेद बाजुला ठेवत संकटात सापडलेल्या पैठणकर नागरीकांसाठी आपल्याला जनतेला काही देणं आहे, याचा सारासार विचार करुन जनहीतासाठी ही मागणी केली असल्याचे नगरसेवक कृष्णा मापारी यांनी सांगितले.


संबंधित लेख

लोकप्रिय