गुवाहाटी : असम राज्य सध्या प्रचंड नैसर्गिक संकटाला सामोरे जात असून, मुसळधार पावसामुळे राज्यातील पूरपरिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. (Assam Flood) आतापर्यंत ५.३५ लाखांहून अधिक नागरिक पूराच्या तडाख्यात सापडले असून, त्यांच्यासाठी मदत व पुनर्वसन मोहिमा युद्धपातळीवर सुरू आहेत.
Assam Flood | २० जिल्ह्यांमध्ये पूराची तीव्र झळ
पूरामुळे असममधील तब्बल २० जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी घुसले असून रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे खंडित झाली आहे. शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. (हेही वाचा : IPL 2025 : 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCB बनली आयपीएल विजेता)
हवामान विभागाचा इशारा – पुढील ४८ तास धोका कायम
हवामान विभागाने (IMD) उत्तर-पूर्व भारतासाठी पुढील ४८ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गुवाहाटीमधील प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्राने धुबरी, दक्षिण सलमारा मानकाचर, ग्वालपारा आणि कोकराझार या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर इतर ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. (हेही वाचा : हायवेवर कार थांबून भाजप नेत्याचे महिले सोबत शारिरीक संबंध, व्हिडिओ व्हायरल)
मृतांचा आकडा ११ वर
पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय अनेकजण बेघर झाले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने आतापर्यंत १६५ मदत छावण्या उभारल्या आहेत. या छावण्यांमध्ये ३१,२१२ नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. तसेच १५७ ठिकाणी मदत वितरण केंद्रे कार्यरत आहेत. (हेही वाचा : धक्कादायक : 73 वर्षीय आजीला लग्नाचे आमिष दाखवून 57 लाखांची फसवणूक)
शेतीचे मोठे नुकसान
या भीषण परिस्थितीचा फटका शेतीलाही बसला आहे. केवळ गेल्या २४ तासांत १२,६१० हेक्टर शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय ९४ जनावरांचा बळी गेला असून, पशुधनाचाही मोठा तोटा झाला आहे. (हेही वाचा : OYO साठी नवीन नाव सुचवा आणि जिंका ₹3 लाख ; रितेश अग्रवाल यांची अनोखी ऑफर)
ब्रह्मपुत्रा, बराक आणि कोपिली यांसह सुबनसिरी, बूढी दिहिंग, धनसिरी, रुकनी, धलेश्वरी, कटाखाल आणि कुशियारा या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदींचा फोनवरून संपर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी फोनवरून संपर्क साधून पूरस्थितीची माहिती घेतली. त्यांनी केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले असून, बचाव व पुनर्वसनासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे स्पष्ट केले. (हेही वाचा : सरकारी जाहिरातीत यशोगाथा दाखवलेला विद्यार्थी त्याच योजनेत अपात्र)
नागरिकांनी सतर्क राहावे – प्रशासनाची विनंती
राज्य प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गरज असल्यास तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आले असून, एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्याही पूरग्रस्त भागात कार्यरत आहेत. (हेही वाचा : RCB च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी ; 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी)