Wednesday, September 18, 2024
Homeराष्ट्रीय..अखेर कालीचरण महाराजाला बेड्या

..अखेर कालीचरण महाराजाला बेड्या

मध्यप्रदेश : राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल  अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजाला मध्यप्रदेशातून पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

खजुराहो येथील बागेश्वर धामममधून पहाटेच्या सुमारास कालीचरण महाराजाला ताब्यात घेण्यात आले. त्याला आज दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येईल. टिकारपारा पोलीस ठाण्यात  त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरत त्यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले होते. यामुळे कालीचरण महाराजांच्या अटकेची मागणी होत होती.

काही ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे रायपूर पोलिसांनी आपले दोन गट महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कालीचरण महाराजांच्या अटकेसाठी पाठवले होते.

कालीचरण महाराज मध्य प्रदेशात खजुराहोपासून २५ किमी अंतरावर बागेश्वर धाम येथील एका भाड्याच्या घरात राहत होते. रायपूर पोलिसांनी पहाटे चार वाजता त्यांना अटक करण्यात आली. आज पोलीस कालीचरण महाराजांना घेऊन रायपूरमध्ये पोहोचणार असल्याची माहिती रायपूरचे पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी दिली.


संबंधित लेख

लोकप्रिय