Wednesday, February 5, 2025

प्राध्यापकांची रिक्तपदे तात्काळ भरा – राजेंद्र पाडवी

शिराळा, दि. २३ : शासन अनुदानित सर्व महाविद्यालये, संस्था व विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक यांची सर्व रिक्त पदांची भरती तात्काळ सुरू करावी. भरती करतांना प्रचलित १०० बिंदू-नामावलीनुसार शिल्लक राखीव जागांचा अनुशेष भरावा यासाठी राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना निवेदन पाठवून रिक्तपदे तात्काळ  करण्याची मागणी केली आहे 

निवेदन म्हटले आहे की, गेल्या दहा वर्षांपासून रिक्त प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया न झाल्यामुळे राज्यातील शिक्षक संवर्गातील हजारो पदे रिक्त आहेत. राज्यातील सेट, नेट व पीएचडी पात्रता धारकांच्या बेरोजगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यांचे सामाजिक, आर्थिक, मानसिक जीवन अस्थिर बनलेले आहे.प्राध्यापकांच्या अभावामुळे शिक्षण,योग्य मार्गदर्शन मिळत नाही. 

परीक्षा वेळेमध्ये घेणे, वेळेत निकाल लावणे या बाबीही अशक्य बनलेल्या आहे. भरती करतांना प्रचलित १०० बिंदू-नामावली आणि विषय व विभाग निहाय आरक्षण धोरणानुसार राखावी जागांचा अनुशेष तात्काळ भरावा, तसेच इथून पुढेही हेच धोरण कायम ठेवावे अशी मागणी बिरसा फायटर्सने केली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles