Monday, March 17, 2025

केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पिंपरी चिंचवड : २६ नोव्हेंबर रोजी कामगारांनी देशव्यापी संप पुकारला होता. केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार कायद्यात केलेल्या बदलाच्या विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांविरोधात जमावबंदी आणि संचार बंदीचे कारण पुढे करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे एकत्रित येण्यास नागरिकांना मज्जाव आहे. मात्र, गुरुवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात, पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील सर्व संघटीत, असंघटीत कामगार संघटनाच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने कामागारांनी केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत पोस्टर प्रदर्शन करत मानवी साखळी केली होती. 

आंदोलनकर्त्यांंनी एकत्र जमून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये कामगार नेते अजित अभ्यंकर, कैलास महादेव कदम, मारुती भापकर, संदीप भेगडे, इरफान सय्यद, केशव घोळवे, किशोर ढोकळे, दिलीप पवार, अनिल माधवराव रोहम यांच्यासह इतर जणांचा समावेश होता. याप्रकरणी पोलीस कर्मचारी मिनाक्षी प्रभू राळे यांनी फिर्याद दिली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles