Thursday, July 18, 2024
Homeजिल्हाआशा, गटप्रर्वत्तकांचा लढा तीव्र करणार - काॅ. उज्वला पडलवार

आशा, गटप्रर्वत्तकांचा लढा तीव्र करणार – काॅ. उज्वला पडलवार

नांदेड : आरोग्य विभागाचा कणा म्हणून आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांची भूमिका असून केंद्र व राज्य सरकार मागील अनेक वर्षापासून आशा वर्कर यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना शासकीय योजनेत समाविष्ट करण्यासह त्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी संघटनेच्यावतीने मार्गी लावू, असे प्रतिपादन सिटू संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार यांनी केले. 

दि. 12 डिसेंबर रोजी उमरी येथे आशा व गट प्रवर्तक फेडरेशनचे दुसरे तालुका अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाच्या खुल्या सत्राचे अध्यक्ष सिटू संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षा काॅ. उज्वला पडलवार या होत्या तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष काॅ शिलाताई ठाकूर यांची उपस्थिती होती. या अधिवेशानाचे उद्धघाटन प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधी चे वैद्यकिय अधिकारी डॉ.नारायण कस्तुरे यांनी केले तर या अधिवेशनाला गंगाधर सूर्यवंशी (चेअरमन), सुरेश वाघमारे यांनी शुभेच्छा दिल्या.

अधिवेशनाचे सुरवात शिक्षणाची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले खुल्यासत्राचे सुत्रसंचालन शोभाताई मारावार तर प्रस्ताविक लांडगे ताई यांनी केले.

यावेळी आशा व गटप्रवर्तकांची नवीन उमरी तालुका कमिटी गठित करण्यात आली. या कमिटीच्या उमरी तालुका अध्यक्षपदी चंद्रकला सुर्यवंशी तर सचिवपदी कविता वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी शोभाताई मारावार उपाध्यक्षपदी मिरा तुपसाखरे सहसचिव पदी संगीता भेरजे कोषध्यक्षपदी आशाताई वाघमारे आदींची नवीन तालुका कार्यकरणी निवडण्यात आली.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय