Saturday, January 28, 2023
HomeNewsपाचवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन कोल्हापूरात

पाचवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन कोल्हापूरात

धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार आणि राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कारांचेही वितरण

कोल्हापूर
: भारतीय संविधानिक मूल्यांची जपणूक करणे, लोकशाही तत्वे रुजवणे, वाचन व लेखन संस्कृती वाढविणे, महामानवांचे विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहचविणे तसेच पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, महात्मा बसवंण्णा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि धम्म विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर आयोजित एकदिवसीय पाचवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे रविवार दि. २९ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ११:०० वा. होणार आहे.

पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाचे उदघाटन सुप्रसिद्ध कवयित्री दिशा पिंकी शेख, यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार संजय आवटे हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत.


तीन सत्रामध्ये होणार्‍या या संमेलनास माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सतीशकुमार पाटील, स्वागताध्यक्ष डॉ. नंदकुमार गोंधळी, प्रमुख पाहुणे अ‍ॅड. मंचकराव डोणे, विजया कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याच सत्रात कोल्हापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे नेते, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार देऊन तर राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीमाई पुरस्कार देऊन डॉ. अनुप्रिया गावडे, रेखा चव्हाण, राजाराम कांबळे, गौरी मुसळे, शंकर पुजारी, रेखा बोर्‍हाडे, मिलिंद माने, कुमार ननावरे, राजश्री हुरकडली, निशांत गोंधळी, डॉ. उषा पाटील, उज्वला मडिलगेकर, पांडुरंग देशमुख, रवींद्र श्रावस्ती, डॉ. वैशाली पाटील, कुसुम राजमाने, सुलोचना चिंदके, उज्वला कांबळे (कोल्हापूर), सोपानराव शिंदे, रंजना सानप, हेमलता झेंडे, सुनिता जगदाळे (सातारा) छाया पाटील, शालिनी गायकवाड, संध्या सावंत (मुंबई) डॉ. संजय वाघंबर (लातूर), डॉ. किरण जगदाळे, अशोक पाचकुडवे (सोलापूर), डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. मीना सुर्वे, छायादेवी आढाव, विजयकुमार कांबळे, सुनिता कुलकर्णी, मंगल यादव, सुधीर कांबळे, शैलजा पाटील (सांगली), डॉ. अनुराधा गोल्हार (पुणे), परिमिता साने (औरंगाबाद), विभावरी मेश्राम, मोनिका तारमळे (कल्याण), डॉ. खंडू वाघमारे, प्रा. बेबीअफरोज सय्यद, (बीड), डॉ. संदीप गायकवाड (नाशिक), विजयकुमार पवार, विजया वाघमारे (नांदेड), आशा खिल्लारे (परभणी), महेश चव्हाण, संध्या खतरडे, सय्यद सलमान सै. शेरू (यवतमाळ), भक्तदास जिवतोडे (चंद्रपूर), तुळशीराम जाधव (नाशिक), शैला वाघ (अहमदनगर), जयश्री सुकाळे (उस्मानाबाद), किशोर चव्हाण (सिंधुदुर्ग), डॉ. प्रीती वाहने (धुळे), अर्चना बिरदवडे (पुणे), कैलास कावरखे (हिंगोली), शंकर अंदानी (अहमदनगर) या महाराष्ट्रातील ५८ मान्यवरांना सन्मानीत करण्यात येणार आहे.

दुसर्‍या सत्रात धम्म विचार आणि भारतीय संविधान या विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. श्रीपाद देसाई, अ‍ॅड.अकबर मकानदार, आचार्य अमित मेधावी, निती उराडे आदी विचारवंत आपले विचार मांडणार आहेत.

तिसरे सत्रात कवी संमेलन असून या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश नाईक, निमंत्रित कवी रंजना सानप, वसंत भागवत, उद्धव पाटील, संघसेन जगतकर, डॉ. स्मिता गिरी, रमेश नाईक, चंद्रकांत सावंत, विद्रोही कवी पी. के., डॉ. चंद्रशेखर मुळे, आराधना गुरव, स्वप्निल गोरंबेकर, शांतीलाल कांबळे आदी मान्यवर कवी आपल्या कविता सादर करणार आहेत तसेच या कवी संमेलनात नवकवींना कविता सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनास
कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व संमेलनाच्या निमंत्रक अ‍ॅड. करुणा विमल यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला अनिल म्हमाने, दयानंद ठाणेकर, सुरेश केसरकर, प्रा. डॉ. शोभा चाळके, विमल पोखर्णीकर, रतन कांबळे, सागर राणे, जितेंद्र कांबळे, सागर कोलप, संभाजी वायदंडे आदी उपस्थित होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

लोकप्रिय