मानवतावादी साहित्य हा भारतीय साहित्याचा प्रेरणादायी आणि प्रोत्साहनदायी अविष्कार आहे. मानवतावादी साहित्यात बहिष्कृत भरताच्या स्वप्नांच्या उजेडाचा झगमगाट आहे. समाजातील विषमतावादी दाहकतेचे दर्शन मानवतावादी साहित्यातून दिसून येते. आंबेडकरवादी साहित्य हे मानवतावादी साहित्य आहे. आंबेडकरवादी कवी नवनाथ रणखांबे यांचा ‘जीवन संघर्ष’ कविता संग्रह वाचून आनंद गगनात मावेनासा झाला. ‘जीवन संघर्ष’ कविता संग्रहात वास्तववादी रचना आहे. या संग्रहातील प्रचलित व्यवस्थेची गाणी ऐकल्यावर विचार करायला भाग पडले. अनुभवांची आणि विचारांची शब्दमय सांगड म्हणजेच कविता होय! कवी आपल्या ‘जीवन संघर्ष ‘ कविता संग्रहातून जीवनातील पाहिलेले आणि ऐकलेले अनुभव या कविता संग्रहात मांडत आहेत. ‘जीवन संघर्ष’ या शब्दात जीवन जगतांनाचा संघर्ष लपलेला आहे.
कवितेच्या रूपाने जीवन संघर्षाची विद्रोही संघर्ष गाथा कवितेत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न कवीने केल्यामुळे कविता संग्रहास दिलेले ‘जीवन संघर्ष’ हे शीर्षक अर्थ पूर्ण आहे. ‘जीवन संघर्ष’ कविता संग्रहातील कवितेत मानवा विषयी निर्भय आणि निर्भीड आवाज आहे. नव्या दमाच्या नवनाथ रणखांबे कवीच्या कविता माणुसकी जपणाऱ्या आणि माणुसकी शिकवणाऱ्या संयमी आहेत तर त्यांनी कवितेतून मानवतावादी विचारांची मशाल पेटवली आहे.
विशेष लेख : वन निवासींवरील अन्याय थांबवा ! – डॉ. अजित नवले
सुसंस्कारित आणि सर्व सामान्य कुटुंबातील कवी नवनाथ रणखांबे यांची ‘ माय तुला मी पाहिलय’ ही कविता वास्तवाचा वेध घेणारी आहे. कवीच्या बाल मनात त्यांच्या आईच्या दुःख, कष्ट, यातनाची जाणीव आजही कवीच्या मनाला स्पर्शून जाते. आई म्हणजे वासल्या त्यागाचे रूप….. ‘माया तुला मी पाहिलय’ या कवितेत पाहायला मिळते. कवी आपल्या कवितेत म्हणतो —
तुझ्या पिल्ल्यांच्या स्वप्नासाठी
तुझी काया मोलमजुरीने …..
दररोज झिजत होती !
गरिबीची श्रीमंत स्वप्ने ….. कष्टातून फुलली होती !
माझ्या स्मृतीने ,
स्वप्ने फुलताना माया , त्याला मी पाहिलय
त्याला मी पाहिलय
विशेष लेख : मोदी आणि राहुलच्या पलीकडे पण जग आहे मित्रांनो… – चंद्रकांत झटाले
मातीवर जीव जोडून जीवापाड प्रेम करणारा शेतकरी आपल्या कविता संग्रहातून शेतकरी आपल्या पुढे उभा कवी करतात. ‘माजोऱ्या पाऊसा’ या कवितेत कवी म्हणतो —
जिथे गरज , तिथे नाहीस ,
जिथे नको, तिथे आहेस,
तुझी हानी , सहन होत नाय,
सोसल्या शिवाय , पर्याय नाय
आपल्या देशातील पाऊस हा लहरी आहे. आपल्या देशातील बहुतांश शेती ही पाऊसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस आपली थट्टा करतो. कधी दिशा भूल करतो. पाऊस कधी रुसला की रुसून बसतो तर कधी भरपूर पडून शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकरी शेतात राबतो म्हणून सर्वांची भूक भागते. कवीच्या कवितेतला आंतरिक ओलावा त्यांच्या शब्दामधून पाझरतो.
हेही वाचा ! नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९२५ जागा
सामाजिक परिस्थितीची व्यथा आणि वेदना कवी नवनाथ रणखांबे यांनी ‘जीवन संघर्ष’ कविता संग्रहात मांडली आहे. ”डॉ. आंबेडकर’ या कवितेतून पिढ्यानपिढ्या एका समाजाला एका वर्गाला आपल्या हक्कापासून आणि मानवी अधिकारापासून कसे दूर ठेवले होते. धर्माच्या नावाखाली नंगा नाच चालला होता ही भावना कवितेच्या हृदयाच्या तळापासून पाझरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर जन्माला आले नसते तर पिढ्यानपिढ्याची गुलामगिरी संपुष्टात आलीच नसती. बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाने आपण जर वागत राहिले तर आपल्या प्रगतीचा रथ कोणीही थांबवू शकत नाही असा आशय कवितेचा संग्रहाच्या तळाशी आहे.
कवी नवनाथ रणखांबे यांचा ‘जीवन संघर्ष’ कविता संग्रह हा अत्यंत उद्बोधक व जीवनाची सत्यता पटवून देणारा आहे.संवेदनशील मनाचे आणि सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवणाऱ्या कवितांचा संग्रह म्हणजेच ‘जीवन संघर्ष’ होय.
हेही वाचा ! इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५७० जागा
‘बानं शिकवलं’ या कवितेत कवी शिक्षणाचे महत्त्व समाजात किती आहे हे पटवून सांगतो. शिक्षणाच्या ज्ञानामुळे चौफेर माणसाचे जगाकडे पाहण्याच्या कक्षा वृदावतात. शिक्षणामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. शिक्षणामुळे अन्यायाविरुद्ध झगडायला बळ मिळते . शिक्षणामुळे जीवन जगण्याचा मार्ग मिळतो. आणि जीवनातील अंधार दूर होतो. तसेच चांगल्या शिक्षणामुळे चांगली पिढी घडू शकते. शिक्षणातून आपला खरा विकास होतो. कवी शिक्षणाचे महत्त्व पटवून देतांना कवितेत म्हणतो —–
‘बा’ माझा ओरडला
लेका आजपासून तुझी
शिक्षण हिच ‘आई ‘
करियर हाच ‘बा’
मुंबई हिच ‘पांढरी’
आई – वडिलाचे मुलांना घडवण्याचे कष्ट आणि त्यांचे प्रोत्साहन या आठवणींना कविता उजाळा देऊन जाते. कवींच्या वडिलांना वाटते माझ्या मुलाने खूप शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे आपल्या कुटुंबाचा आधार बनून घराण्याचे नाव मोठे करावे. प्रगती करून आपल्या वडिलांची स्वप्ने पुर्ण करावीत म्हणून आपल्या मुलाला गाव सोडून मायावी नगरीत पाठवले. या कवितेतून शिक्षणासाठी आणि करियर करण्यासाठी प्रोत्साहन देणारा ‘बा’ कवितेतून दिसून येतो. बाबासाहेबांच्या चळवळीत आपल्या मुलाने काम करावे लोकांसाठी जगावे आणि बाबासाहेबांच्या चळवळीचा शिलेदर आपल्या मुलाने व्हावे असे वडिलांचे बोल व्यक्त करताना कवी कवितेत पुढीलप्रमाणे व्यक्त होतो आहे —
शिक्षण वाघिणीचं दूध आहे
भीमाच्या चळवळीचा गाभा आहे
लोकांसाठी तुझं ………..
जगणं हेच तुझे जीणं आहे.
भीमाच्या चळवळीचं …….
नवनाथा शिलेदार तुला बनणं आहे !
बंपर भरती : ESIC Recruitment 2022 : ईएसआयसीत क्लर्क भरती
आज नवनाथ रणखांबे आंबेडकरीवादी साहित्यिक म्हणून आपली भूमिका साहित्याच्या माध्यमातून मांडत आहेत. विविध साहित्य संमेलन, कवी संमेलन, वर्तमानपत्र, इ. मधून ते आपले सामाजिक प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. विविध संस्था आणि संघटनेतून ते समाज प्रबोधन आणि सामाजिक कार्य ही करतांना दिसत आहेत. जीवन संघर्ष कविता संग्रहातील कविता या विविध विषय मांडणाऱ्या असून वाचणीय आहेत.
पुस्तक – जीवन संघर्ष
कवी – नवनाथ रणखांबे
पुस्तक परीक्षण लेखक – नरेश अहिरे,
देवगाव, मुरबाड / ठाणे