Pandharpur bus accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. पंढरपूरला जाणारी एक खासगी बस ट्रॅक्टरला धडकून दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी होते. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर हा अपघात घडला. डोंबिवलीहुन निघालेली ही खासगी बस पनवेल हद्दीत आली असता ट्रॅक्टरला धडकली आणि 20 फूट खोल दरीत कोसळली. (Pandharpur bus accident)
अपघातात जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. मृतांमध्ये बसमधील तिघे आणि ट्रॅक्टरवरील दोघांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची अधिक माहिती अशी की, प्रवाशांनी भरलेली ही बस रात्री एक वाजता अचानक ट्रॅक्टरसमोर आली. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस 20 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


हेही वाचा :
गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ
मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना
मोठी बातमी : अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेदरम्यान गोळीबार
धक्कादायक : अंगणवाडीत शाळेत पोषण आहारात आढळले बेडक
निवासी आदिवासी आश्रमशाळांची वेळेबाबत आदिवासी विकास मंत्री काय म्हणाले पहा !