Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाविश्वशेतकऱ्याच्या पोराची टीम इंडियामध्ये दणक्यात एंट्री, क्रिकेटच्या वेडापायी बोर्डाची परीक्षाच दिली नाही...

शेतकऱ्याच्या पोराची टीम इंडियामध्ये दणक्यात एंट्री, क्रिकेटच्या वेडापायी बोर्डाची परीक्षाच दिली नाही…

Source :- Maharashtra Times

नवी दिल्ली : शेतकऱ्याचा मुलगा असला तर तो शेतातच राबणार, या रुढी आता संपलेल्या आहेत. आता एका शेतकऱ्याचा पोरगा तर थेट भारतीय संघातच दाखल झाला आहे. गुणवत्तेच्या जोरावर या खेळाडूने आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे.

चला तर समजून घेऊ – मासिक पाळी

शेतात तो नेहमीच जायचा. शेतातील जमिन उंच-सखल असली तर त्याने तिथे एक खेळपट्टी बनवली होती. तिथे तो गोलंदाजीचा सराव करायला. त्याचे क्रिकेटचे वेड पाहून त्याला एका स्थानिक अकादमीमध्ये पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला. या अकादमीत तो एवढा मग्न झाला होता की, क्रिकेट हेच त्याच्यासाठी सर्व काही होते. पण जेव्हा त्याची १६-वर्षांखालील संघात निवड झाली नव्हती तेव्हा तो फार निराश झाला होता. यावेळी क्रिकेट सोडण्याचा निर्णय त्याने घेतला होता. पण यावेळी त्याच्या प्रशिक्षकांनी त्याची समजूत घातली आणि त्याला पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळवले. त्यानंतर त्याने मागे वळून कधीच पाहिले नाही. 

मोबाईल खरेदी करताय ? ‘या’ कंपनीनं आणला 8,499 रुपयांमध्ये स्वस्त फोन, 6,000 mAh बॅटरी पाच दिवस चालणार चार्जिंगविना

ही गोष्ट आहे ती भारतीय संघात स्थान मिळवलेल्या रवी बिश्नोईची(Ravi Bishnoi). आयपीएल खेळत असताना रोहित शर्मा(Rohit Sharma)ने प्रतिस्पर्धी संघात असतानाही रवीचे कौतुक केले होते. त्यानंतर आता कर्णधार झाल्यावर रवीला संघात स्थान द्यायला रोहित विसरला नाही. रवीने एकदा तर क्रिकेट खेळण्यासाठी बोर्डाची परिक्षादेखील दिली नसल्याची गोष्ट आता समोर आली आहे. एकदा रवीची राजस्थान रॉयल्ससाठी नेट बॉलर म्हणून निवड करण्यात आली होती. राजस्थान रॉयल्सचे सराव शिबीर सुरु झाले होते आणि त्यामध्ये रवी जाणार होता. त्यावेळी बोर्डाच्या परीक्षाही सुरु होणार होत्या. 

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती

त्यामुळे घरच्यांनी रवीला सराव शिबीरात न जाता परिक्षा द्यायला सांगितले होते. पण रवी क्रिकेटचा एवढा वेडा आहे की, सराव शिबिरासाठी त्याने बोर्डाची परीक्षाही दिली नाही. रवीला सुरुवातीला मध्यमगती गोलंदाज व्हायचे होते, पण त्यानंतर त्याने लेग स्पिनर व्हायचे ठरवले. आता लेग स्पिन करत रवी दिग्गज फलंदाजांच्या दांडी गुल करताना दिसत आहे. त्यामुळे आता भारतीय संघात दाखल झाल्यावर रवी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल

प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी

शेळी पालन योजना महाराष्ट्र, 75% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु, लगेच भरा!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय