Monday, January 13, 2025
HomeNewsशेतकरी संघटनांच्या 8 डिसेंबरच्या भारत बंदला SFI चा पाठिंबा

शेतकरी संघटनांच्या 8 डिसेंबरच्या भारत बंदला SFI चा पाठिंबा

शेतकरीपुत्र म्हणून बंदमध्ये सामील होण्याचे विद्यार्थी युवकांना आवाहन

बीड (लहू खारगे) : शेतकरी संघटनांच्या 8 डिसेंबरच्या भारत बंदला स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंंडियाने जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच शेतकरीपुत्र म्हणून विद्यार्थी – युवकांनी बंदमध्ये सामील होण्याचे आवहान एसएफआय चे जिल्हा अध्यक्ष सुहास झोडगे व जिल्हा सचिव लहू खारगे यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट धार्जिण्या व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सुरू असलेला संघर्ष देशव्यापी वळण घेत आहे. दिल्ली येथे संपन्न झालेल्या शेतकरी संघटनांच्या बैठकीत शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली आहे. देशातील 500 हून अधिक शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदमध्ये शेतकऱ्यांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. 

महाराष्ट्रात समविचारी शेतकरी संघटना तसेच कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला व समाजसेवी संघटनांचा समन्वय करून महाराष्ट्रात भारत बंदच्या दिवशी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी किसान सभेसह स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने प्रयत्न सुरू केले आहेत. 

देशभरातील विविध राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजप विरहित पक्षांनी त्या त्या राज्यांमध्ये भारत बंदला सक्रिय पाठिंबा देत शेतकऱ्यांची ठाम बाजू घेतली आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना रोखण्यासाठी सुरू असलेल्या दिल्ली येथील अन्नदाता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवहान करण्यात आले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय