Friday, December 6, 2024
Homeजिल्हाशेतकरी कायदे, पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा, अखिल भारतीय किसान संघर्ष समितीची...

शेतकरी कायदे, पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा, अखिल भारतीय किसान संघर्ष समितीची मागणी

नाशिक : शेतकरी कायदे रद्द करा, पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा, अशी मागणी अखिल भारतीय शेतकरी संघटना समन्वय समितीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

आज 26 जुलै ला दिल्लीत सीमारेषेवर सुरू असलेल्या आंदोलन ला 8 महिने पूर्ण होत आहेत. आंदोलन स्थळी 600 पेक्षा अधिक शेतकऱ्याचा मृत्य झाला आहे. केंद्र सरकारने कायदे रद्द करून आंदोलक शेतकऱ्यांशी बोलणी सुरू करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुरू केलेली हेल्पलाईन प्रभावी पणे कार्यरत करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी किसान सभेचे कॉम्रेड राजू देसले, अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड सुनिल मालुसरे, ऍड प्रभाकर वायचळे, बहुजन शेतकरी संघटनेचे रमेश औटे, अशोक खालकर हे उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय