मुंबई : बॉलिवूड मध्ये आपल्या मधाळ आवाजाने आणि अनोख्या अंदाजाने छाप पाडलेले गायक संगीतकार बप्पी लहरी यांचे मुंबईत क्रीटी केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. ते 69 वर्षांचे होते. बप्पी लहरी किंवा बप्पी दा म्हणून रसिकांना ओळख असली तरीही अलोकेश लहिरी हे त्यांचं खरं नाव होते.
बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 ला पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी मध्ये झाला होता. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है.. तेरा प्यार ही आणि यासारखी अनेक सुपरहिट गाणी बप्पीदांनी गायली आहेत.
डिस्को संगीताला नुसते हिंदी चित्रपटात वापरलेच नाही तर त्यात प्रावीण्य मिळवून त्यांनी अशी गाणीही गायली आहेत. इ.स.1980 च्या दशकात त्यांच्या डिस्को डान्सर, नमक हलाल व शराबी सारख्या चित्रपटांमुळे ते खूप प्रसिद्ध झाले.
पंजाबी अभिनेता आणि लाल किल्ल्यावरील आंदोलनातील मुख्य आरोपी दीप सिध्दूचा अपघाती मृत्यू
डॉ. आंबेडकर जन्मभूमी स्मारक वाचविण्यासाठी भीमज्योत मशाल यात्रेस सुरूवात
लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा