Wednesday, September 18, 2024
HomeNewsमान सरकारने सुरक्षा हटवताच प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या

मान सरकारने सुरक्षा हटवताच प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या

मुंबई : पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आप सरकारने एक दिवसापुर्वीच त्यांची सुरक्षा हटवली होती.

गायक सिद्धू मुसेवाला सह आणखी दोन साथीदार जखमी झाले. सिद्धू मुसेवाला यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले. त्यांच्या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या या हत्येमुळे संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.  त्याचबरोबर चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

राज्यसभा निवडणूक : काँग्रेसच्या 10 उमेदवारांची यादी जाहीर

पंजाबी चित्रपट आणि संगीत क्षेत्रात आपली छाप पाडणाऱ्या सिद्धू मूसेवाला यांचा जन्म 11 जून 1993 रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील मुसा गावात एका पंजाबी कुटुंबात झाला. यांचे खरे नाव शुभदीप सिंग सिद्धू होते.

सिद्धू मुसेवाला हे काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक दिवसापुर्वीच त्यांची सुरक्षा हटवली होती.

मेगा भरती : भारतीय पश्चिम रेल्वेत 3612 पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी !

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे रिक्त पदांसाठी भरती, 31 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये रिक्त पदासाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय