सुरगाणा (गणेश चौधरी) : देशभरातून पोलिओ कायम स्वरुपी हद्दपार करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागा तर्फे 0 ते 5 वर्षा खालील बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील 20009 बालकांपैकी 18388 बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. यामध्ये ग्रामीण रुग्णालय बा-हे येथे 3187, बोरगाव 2213, बुबळी 1630, माणी 3881, मनखेड 1915, पळसन 1830, पांगारणे 1692, उंबरठाण 2040 याप्रमाणे रुग्णालया निहाय लसीकरण करण्यात आले.
या कामी 182 बुथ उभारण्यात आले होते. एकूण 364 कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, परिचारिका, अंगणवाडी शिक्षिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस यांनी काम पाहिले.
तालुका वैद्यकीय अधिकारी दिलीप रणवीर, आरोग्य विस्तार अधिकारी एम.ए. अन्सारी, आरोग्य सहाय्यक सुभाष बागुल, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे, पांगारणे येथील डॉ. जयेंद्र थविल रानपाडा, डॉ. श्रीमती सिरसाठ लाडगाव भास्कर चौधरी, बोरगावच्या सरपंच श्रीमती भरसट, मुरलीधर ठाकरे, संदीप भोये, सुरगाणा देविपाडा प्रभारी मुख्याध्यापक रतन चौधरी, रगतविहीर डॉ. देवरे, परिचारिका सुशिला पवार, डॉ. विंदाळकर यांच्या हस्ते लसीकरण करण्यात आले.