मुंबई : केंद्र सरकारच्या योजनेनुसार सांगली जिल्ह्यातील भोसे या गावातून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. परंतु भोसे येथील रस्त्यात येणाऱ्या ४०० वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडांसाठी हायवेचा नकाशा बदलण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील भोसे या गावातून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. या गावात ४०० वर्षापूर्वीचे जुने वडाचे झाड आहे. सर्व्हिस रोड चे काम करत असताना हे वडाचे झाड तोडले जाणार होते. परंतु हे झाड तोडण्यास पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण तज्ज्ञांनी तीव्र विरोध केला होता.
महाराष्ट्र सरकारकडे तसेच केंद्र सरकारकडे रस्त्याचा मार्ग बदलण्याची मागणी केली होती. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही केंद्रीय
मंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर या हायवे च्या नकाशामध्ये बदल करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या आहेत.