Thursday, January 23, 2025

अखेर त्या बुवाला आळंदी पोलिसांनी केली अटक, नातवाने केला होता व्हिडीओ व्हायरल

पुणे : वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या ८५ वर्षीय वृद्धाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. गजानन बुवा चिकणकर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

३१ मे रोजी घरात पाण्याच्या वादावरुन एका ८५ वर्षीय वृद्धाने ८० वर्षीय त्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर पोलिसांवर सामाजिक दबाव वाढला होता. त्यानंतर हिललाईन पोलिसांनी आरोपी विरोधात सुमोटोने गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वृद्धेला भेटून तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र वृद्धेने पती गजानन बुवा चिकणकर याच्याविरोधात कुठलीही तक्रार नसल्याचं सांगितलं. अखेर सामाजिक दबाव पाहता पोलिसांनी सु मोटोने मारहाणीचा गुन्हा दाखल केला. गजानन बुवा चिकणकर आळंदीला गेला होता. त्यामुळे पोलिसांचं एक पथक आळंदीला रवाना झालं होतं. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात घडली होती. याच गावात गजानन बुवा चिकणकर आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. या वृद्धाला घरातील इतर सदस्यही दचकतात. विशेष म्हणजे हा वृद्ध स्वत:ला हभप समजतो. पण स्वत:च्या घरात महिलांशी अत्यंत निघृणपणे वागतो. या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles