Raj Thackeray : राज्यात नुकतीच लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपाप्रणित एनडीएला विनाशर्त पाठिंबा दिला आहे. अशातच आता पदवीधर निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीसाठी मनसेने आपला उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरवला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अभिजीत पानसे याना उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण पदवीधर हा भाजप पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो. निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. अशात आता राज ठाकरे यांनी अभिजीत पानसेंचं नाव जाहीर केल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगली आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असून भाजपाचे निरंजन डावखरे हे या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अशात मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केली आहे. कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलै 2024 ला मतमोजणी होणार आहे. मात्र आता भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडल्यानंतर विधानपरिषदेसाठी आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Raj Thackeray
दरम्यान, अभिजीत पानसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अभिजीत पानसे आणि मनसेचे खेडमधील नेते वैभव खेडेकर यांनी आज वर्षा निवास्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? हे समजू शकलेले नाही.
हेही वाचा :
मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !
ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान
NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
युनिट मुख्यालयाच्या कोट्यासाठी अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन
सेल्फी जीवावर बेतली, नवविवाहिता शंभर फूट दरीत कोसळली
धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी