Wednesday, February 19, 2025

समतेचा, धम्मक्रांतीचा प्रारंभ देहूरोड येथे झाला – डॉ. किशोर खिल्लारे

पिंपरी चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगून येथील जागतिक परिषदेत भेट म्हणून मिळालेली भगवान गौतमबुद्धांच्या मूर्तीची २५ डिसेंबर १९५४ रोजी देहूरोड येथे स्थापन केली. या स्थापनेला सोमवारी (२५ डिसेंबर) ६७ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त देहूरोड येथील धम्मभूमीवर विविध उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी डॉ.किशोर खिल्लारे ह्यांनी उद्योजक व नॅशनल नेटीव फेडरेशनचे महासचिव मनोज गजभिये यांच्यासोबत भेट दिली.

त्यावेळी बोलताना बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक डॉ.किशोर खिल्लारे म्हणाले की, २५ डिसेंबर हा दिवस धम्मक्रांती व समाजक्रांतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. १४ ऑक्टोबर १९५६ च्या पुर्वी २ वर्ष अगोदर देहूरोड येथे बुध्द मूर्तिची स्थापना करून भगवान बुध्दाचा धम्म हा समाजक्रांतीसाठी निवडण्याचा संकेत दिला. मानवी कल्याणासाठी प्रज्ञा, शिल, करुणा या त्रिसरण व पंचशील तसेच उत्तम जीवनशैली सांगणारा अष्टांगिक मार्ग हा धर्म नसून धम्म आहे, वैश्विक कल्याणाचा जीवनमार्ग आहे. 

सर्वप्रकारच्या शोषणापासून मुक्त करणारे  समतावादी समाज निर्मितीचे तत्वज्ञान बुद्धाने सांगितले याचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले की, बौद्ध धम्म समतेचा पुरस्कर्ता असलेला, ज्ञानी होवून अत्त दीप भव म्हणजे स्वयं प्रकाशित व्हा, हे आवर्जुन सांगणारा धम्म आहे. शिवाय तो मानवाला केंद्र स्थानी ठेवून मानवतेचा पुरस्कार करणारा व विज्ञानावर आधारीत धम्म म्हणून राष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी व प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

खिल्लारे म्हणाले, समाजक्रांती च्या दृष्टीने २५ डिसेंबर १९२७ हा महत्त्वाचा दिवस आहे. कारण ह्या दिवशी  महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षापासून बहुजन समाजाला विशेषत: अस्पृश्यांना व स्त्रियांना गुलाम करणाऱ्या, जनावरपेक्षाही अत्यंत हीन वागणूक देणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करून हिंदुत्ववादी सनातन धर्माला हादरा दिला. ह्याची प्रेरणा घेवून जाती अंताचा लढा तीव्र करण्याचे आवाहन केले.

ह्या धम्मभुमिवर सकाळी शेकडो भंतेजीच्या उपस्थितित हजारों बौद्ध अनुयांनानी भगवान बुध्दाना वंदन केले. ही घटना अत्यंत नेत्रदीपक होती, असेही खिल्लारे म्हणाले.

– क्रांतिकुमार कडुलकर


Related Articles

- Advertisement -

Latest Articles