Thursday, March 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडप्लँगोथाँन मोहीमेत सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय याचा उत्फुर्त प्रतिसाद

प्लँगोथाँन मोहीमेत सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय याचा उत्फुर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड : पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी देशाच्या 75 व्याअमृत महोत्सवानिमित्त आणि हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात प्लँगोथाँन मोहीम राबविली आहे. त्यामध्ये नवी सांगवीतील बाबुराव घोलप परिसरापासून ते शनी मंदिर परिसर व पीडब्ल्यूडी मैदानापर्यंत परिसर स्वच्छ केला. यामध्ये पालिकेची घंटागाडी,हातगाडी घेऊन आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याच बरोबर काशीविश्वेश्वर शाळेचे आणि बाबुराव घोलप महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था ही सहभागी झाली होती.

यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की आपली पालिका नागरिकांच्या हितासाठी नेहमीच विधायक काम करत असते त्यांच्या चांगल्या उपक्रमाचे आपण कौतुक करून मोहिमेत सहभागी झाले पाहिजे, हेच आपले खरे सामाजिक दायित्व आहे आणि सुट्टीच्या दिवशी आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ह प्रभाग क्षत्रिय अधिकारी विजयकुमार थोरात, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी कांबळे मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश पाटील, आरोग्य निरीक्षक संदीप कोठावडे, मुकादम कविता गोहेर, आशा गायकवाड, अमन बिराडे, सिद्धार्थ जगताप सह बाबुराव घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसएसचे विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर जांभुळकर, डॉ. जितेंद्र वडसिंगकर, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, हनुमंत पंडित, काशी विश्वेश्वर शाळेच्या मुख्याध्यापिका रागिणी देशपांडे, शिक्षिका कांचन नेहते, तनुजा सरवदे सह आरोग्य सफाई कर्मचारी दिलीप नाईकनवरे, गणे

श भंगर, प्रमोद ढसाळ सह अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था, आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय