Tuesday, July 2, 2024
Homeताज्या बातम्याMazi Ladki Bahin Yojana : ‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना...

Mazi Ladki Bahin Yojana : ‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!

Mazi Ladki Bahin Yojana : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना 2024 सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच अर्थसंकल्प जाहीर केला. त्यावेळी अजित पवार यांनी अनेक घोषणा केल्या. त्यामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना देखील आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे. या योजने संदर्भातील सर्व माहिती जाणून घ्या. Mazi Ladki Bahin Yojana

योजनेचा लाभ कोणाला मिळणार? (Mazi Ladki Bahin Yojana

या योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिलांना मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेची पात्रता :
– महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी.
– विवाहित, विधवा, घटस्फोटीत किंवा निराधार असावी.
– वय 21 ते 60 वर्षे असावे.
– बँक खाते असणे गरजेचे आहे.
– कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे :
– आधार कार्ड
– महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
– कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
– बँक खाते, पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– रेशन कार्ड
– योजनेच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र

अर्ज कसा करायचा?
पात्र असलेल्या महिला या योजनेचा अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करू शकतात. ऑनलाईन अर्ज करता येत नसल्यास अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प, ग्रामपंचायत वार्ड इत्यादी ठिकाणी अर्ज करता येईल.

या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळून त्यांच्या जीवनात सुधारणा होण्यास मदत होईल. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माचाही मोठा निर्णय

मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा

T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

India Post : भारतीय पोस्ट मध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय