Wednesday, February 5, 2025

एल्गार परिषद प्रकरण : आदिवासी हक्क कार्यकर्ते स्टेन स्वामी यांचे निधन !

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेलेे आदिवासी हक्क कार्यकर्ते स्टेन स्वामी यांचे आज वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. या संदर्भात, फादर स्टॅन स्वामी ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांंनी मुंबई उच्च न्यायालयात याची माहिती दिली आहे.  

28 मे रोजी कोर्टाच्या आदेशानंतर स्वामींवर होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.  खासगी रुग्णालयात त्याच्या उपचाराचा खर्च त्याचे सहकारी व मित्र घेत होते. मे महिन्यात स्वामींनी हायकोर्टाच्या सुट्टीतील खंडपीठाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगितले की, तळोजा जेलमध्ये त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यावेळी त्यांनी अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी हायकोर्टाकडे केली होती.त्यावेळी स्वामी असेही म्हणाले की जर तेथे असेच कार्य चालू राहिले तर ते लवकरच मरणार आहे. अखेर आज त्यांचे निधन झाले.

31 डिंंसेबर, 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदे मध्ये प्रक्षोभक भाषण केले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांचा असाही दावा आहे की, या भाषणामुळे दुसऱ्या दिवशी भीमा – कोरेगाव शोर्य स्मारकाजवळ हिंसाचार झाला.

 

परंतु तीन वर्ष होऊनही या घटनेतील आरोपी असलेले विचारवंत, लेखक, मानव अधिकार कार्यकर्ते अटकेत आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles