Saturday, April 20, 2024
Homeग्रामीण२४ सप्टेंबरला बीड जिल्ह्यातील सर्व तहसिलवर योजना कर्मचाऱ्यांचा एल्गार

२४ सप्टेंबरला बीड जिल्ह्यातील सर्व तहसिलवर योजना कर्मचाऱ्यांचा एल्गार

धारूर : बीड शालेय पोषण आहार कामगार, आशा वर्कर्स व गटप्रर्वतक, अंगवाडी कर्मचारी, घरकामगार, ऊस तोड वाहतुक कामगार, नगरपालिका, नगर परीषद, ग्रामसेवक इत्यादीसह अनेक बीड जिल्ह्यातील सर्व योजना कर्मचारी त्यांच्या न्याय  मागण्यासाठी बीड जिल्हा सीटूचे अध्यक्ष प्रा. बी.जी. खाडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सीटूचे जिल्हा सचिव डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.

आशा व गट प्रर्वतकाना आरोग्य सेवेत कायम करा, शासकीय परीपत्रकानुसार आशाना व गट प्रर्वतकाना २००० रू वाढ द्या, शालेय पोषण आहार कामगाराना तामिळनाडु राज्याच्या धर्तीवर ११ हजार रुपये मानधन द्या. शालेय पोषण आहार कामगांराना शासकीय सेवेत कायम करा, ऊसतोडणी वाहतुक कामगाराची कल्याणकारी मंडळात नोंदणी सुरू करा. ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन केलेल्या महिलांना आरोग्य सेवेचे लाभ द्या. बांधकाम कामगांराना कल्याणकारी मंडळाकडून लाभ ताबडतोब द्या, घरेलु कामगांराना अन्न सुरक्षेचे रेशनकार्ड द्या आदी मागण्यासाठी २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलवर आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनासाठी प्रा. बी जी खाडे, डॉ. अशोक थोरात, कॉ. शिवाजी कुरे, कॉ. दत्ता डाके, कॉ. किरण सावजी, कॉ अशोक पोपळे, कॉ प्रभाकर नागरगोजे, कॉ सय्यद रज्जाक, सिताराम थोरात, सुवर्णा रेवले, कॉ. मिरा शिंदे, किर्ती कुटे, उषा खाडे यांनी जास्तीत जास्त योजना कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय