निवडीचे स्वागत, माऊली मंदिरात पूजा
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांची शिवसेना ( मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खेड उपतालुका प्रमुख पदी सार्थ निवड झाल्या बद्दल संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्रींचे चलपादुकांची पूजा करीत अभिषेख करण्यात आली. यावेळी मोठ्या कडवट शिवसैनिक, शिवसेना आळंदी शहर पदाधिकारी, महिला आघाडी युवासेना पदाधिकारी व सर्व हितचिंतकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230530-WA0009.jpg)
यामध्ये उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे, खेड तालुकाप्रमूख रामदास धनवटे, उपतालुकाप्रमुख किरण गवारे, युवा नेते डी.डी. घुंडरे पाटील, माजी नगरसेवक रमेश गोगावले, प्रफुल्ल प्रसादे, उपशहर प्रमुख शशिकांत राजेजाधव, मनोज पवार, तुकाराम माने गुरुजी, युवासेना उपशहरप्रमुख निखिल तापकीर,दत्ता तापकीर आशीष गोगवले, तुषार तापकीर, महिला आघाडी अनिता झुझुम यांचेसह ग्रामस्थ,आळंदी देहुफाटा परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते. आळंदी पंचक्रोशी परिसरातून या निवडीचे जोरदार स्वागत करण्यात आले.खेड तालुका शिवसेनेच्या उपतालुका प्रमुख पदी माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर यांची निवड झाल्याने आळंदी पंचक्रोशीत शिवसैनिकांच्या नवचैतन्य निर्माण झाले आहे. जाणकार सामाजिक, विधायक विकास कामांची माहिती असल्याने आळंदी पारिसराचे विकासास या पदाचे माध्यमातून न्याय दिला जाईल अशी ग्वाही यावेळी तापकीर यांनी दिली.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230530-WA0010-1024x576.jpg)
येत्या काळात आळंदी, चाकण, खेड या खेड तालुक्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने तिन्ही नगरपरिषदांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त शिवसैनिक नगरसेवक कसे निवडून आणता येतील यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार असल्याने या निवडीचे शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले आहे. महिला आघाडीच्या नेत्या अनिता झुजम यांनी निवडीचे स्वागत केले असून सार्थ निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा एकदा आळंदी नगरपरिषदेत शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आणण्यास सर्वानी एकत्रित पणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/IMG-20230529-WA0004-5-1013x1024.jpg)