Thursday, April 25, 2024
Homeआंबेगावमनरेगा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – किसान सभेची मागणी

मनरेगा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा – किसान सभेची मागणी

जुन्नर : मनरेगा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच यावेळी 31 मार्च 2023 रोजी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

जुन्नर तालुक्यात रोजगारासाठी स्थलांतर हे वर्षानुवर्षे सुरू आहे. लोकांना गावातच रोजगार मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान सभा सातत्याने काम करत आहे. काहीच दिवसांपूर्वी प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मनरेगा आढाव बैठक झाली. परंतु अंमलबजावणी होत नसल्याचे किसान सभेचे म्हणणे आहे. 

घाटघर गावात काम मागणी केलेल्या मजूरांना काम द्या, खटकाळे – खैरे येथील वृक्ष संगोपनाचे बंद केलेले काम पूर्ववत सुरू करा आणि मागील काम केलेल्या मजूरांची थकित मंजूरी अदा करा, प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व तहसिलदार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, सदस्य संदिप शेळकंदे, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव नवनाथ मोरे उपस्थित होते.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय