मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जुनच्या दुसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जून अखेरीस जाहीर होणार आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र यावेळी कोरोनाची परिस्थितीत नियंत्रणात असल्याने या परिक्षा ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या होत्या. या परिक्षांचा निकाल कधी लागणार यावर सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करण्यात येत होते. आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावीच्या निकालाबाबतच्या तारखांबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
HQ दक्षिणी कमांड पुणे येथे विविध पदांसाठी भरती, 10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी !
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीचं काम अंतिम टप्प्यात आले असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बारावी आणि शेवटच्या आठवड्यात 10 वीचा निकाल लागणार आहे, असे स्पष्ट केले आहे.
यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरु झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. तसेच दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर बारावीच्या परीक्षा 4 मार्चला सुरु होऊन 7 एप्रिल रोजी संपल्या. बारावीची ही परीक्षा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी दिली होती.
या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल
www.maharesult.nic.in
www.maharesult.nic.in
msbshse.co.in
hscresult.11thadmission.org.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 129 पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
आयडीबीआय बँकेत तब्बल 1544 जागांसाठी मेगा भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज आता एडिटही करता येणार, काय आहे खासियत वाचा !