Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीयखाद्यतेलाच्या किंमती सणापूर्वी कमी होणार

खाद्यतेलाच्या किंमती सणापूर्वी कमी होणार

किमती 15 रुपयांनी कमी होणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तेल कंपन्यांना येत्या दोन आठवड्यात किंमती 15 रुपयांनी कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे, जागतिक किमतीत घसरण होत असताना स्वयंपाकाच्या तेलाच्या किरकोळ किमतीत आणखी कपात करण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी अन्न मंत्रालयाने गेल्या महिन्यात खाद्य तेल उत्पादक आणि व्यापारी संस्थांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मे महिन्यानंतरची ही तिसरी बैठक होती.

पाम तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार इंडोनेशियाने शिपमेंटवरील निर्बंध उठवल्यानंतर सूर्यफूल आणि सोया तेलांचा पुरवठा सुलभ झाला आहे. त्यामुळे जागतिक खाद्यतेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. फॉर्च्युन रिफाइन्ड सनफ्लॉवर, सोयाबीन ऑइलच्या लिटर पॅकची किंमत 220 वरून 195 रुपये आणि सोयाबीन (फॉर्च्यून) आणि काची घणी तेल 1 लिटर पॅकची 205 वरुन 195 रुपयांपर्यंत कमी झाली आहे.

सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे ते स्वस्त झाले आहेत. कमी शुल्काचा संपूर्ण लाभ ग्राहकांना नेहमीच देण्याचे निर्देश सरकारने दिले. रशिया युक्रेन युद्ध,इंडोनेशियातील निर्यात निर्बंधांमुळे खाद्यतेल तुटवडा निर्माण झाला होता. भारतात 60 टक्के खाद्यतेल आयात करण्यात येते. सरकारने इंडोनेशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय