मोदींच्या टीकेला केजरीवाल यांचे उत्तर
नवी दिल्ली: सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून सध्या एकमेकांवर कठोर टीकाटिप्पणी केली जात आहे.
नरेंद्र मोदी यांनी ईडी मूळे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत,अशी टीका केली होती.दिल्ली विधानसभेत त्यास प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की,भाजप सरकार केंद्रीय तपासयंत्रणांचा वापर करून भ्रष्ट लोकांना भाजपमध्ये सामील करून घेत आहे.
देशातील अनेक राज्यांत ‘ईडी’,सीबीआयच्या करवाईवरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, ‘देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ईडी आणि सीबीआयने एका व्यासपीठावर एकत्र आणलं नाही, तर एका भाजपमध्ये एकत्र करून टाकलं. सांगा तुरुंगात जायचंय की भाजपमध्ये? मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्याही कानावर बंदूक ठेवली आणि त्यांनाही विचारलं तेव्हा त्यांनी तुरुंगात जायचंय असं म्हटलं.असे केजरीवाल म्हणाले.यावेळी त्यांनी नारायण राणें कानावर बंदूक ठेवली अन ते भाजपमध्ये सामील झाले.असा उल्लेख केला.
ईडी,सीबीआय मूळे देशातील भ्रष्टाचारी भाजपमध्ये!
- Advertisement -