Wednesday, August 17, 2022
Homeकृषीई - पिक पाहणी : आदिवासी भागात रेंजसह सर्व सुविधा असणाऱ्या मोबाईलचा...

ई – पिक पाहणी : आदिवासी भागात रेंजसह सर्व सुविधा असणाऱ्या मोबाईलचा अभाव, अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन नोंदणी करण्याची मागणी

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर / शिवाजी लोखंडे : आदिवासी भागात रेंजसह सर्व सुविधा असणाऱ्या मोबाईलचा अभाव असल्याने अधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन ई – पीक पाहणीची नोंदणी करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने नायब तहसीलदार सचिन मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ई – पिक पाहणी शासनाचा हा निर्णय सर्व सामान्य गरीब आदिवासी शेतकन्यांवर अन्यायकारक आहे. कारण सर्वच शेतकऱ्यांकडे सर्व सुविधा असणारे मोबाईल उपलब्ध नाहीत, दुर्गम भाग असल्याने मोबाईल रेंजची समस्या आहे. तसेच अंशत : उपलब्ध मोबाईल धारक आदिवासी योतकरी सदरची ई – पिक पाहणी सारख्या नोंदी बिनचूक करू शकत नाहीत. त्यामध्ये काही शेतकरी हे वयोवृद्ध, अंध, अपंग असल्याने या नोंदी करण्यात ते असमर्थ आहेत. त्यामुळे निर्धारित मुदतीमध्ये ई – पिक पाहणी नोंदी न झाल्याने आदिवासी शेतकऱ्यांची संभाव्य नुकसान होणार आहे.

हेही वाचा ! जुन्नर : ..अन्यथा तहसीलदार कार्यालयाच्या दारात बेमुदत ठिय्या आंदोलन – किसान सभेचा इशारा

यासाठी शासनाचे तालुका स्थरावरील जबाबदार सनियंत्रण अधिकारी यांनी कृषी मंडल अधिकारी , कामगार तलाठी व कृषी अधिकारी तसेच कृषी सेवक यांनी गावोगावी जाऊ ई – पीक पाहणी करुन घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी हिरडा कारखाना अध्यक्ष काळू शेळकंदे, पंचायत समिती सदस्य काळू गागरे, पोपट रावते, अखिल भारतीय किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, बुधाजी तळपे, देवराम नांगरे, रोहिदास बोऱ्हाडे, कोंडीभाऊ बांबळे आदीसह उपस्थित होते.

हेही वाचा ! जुन्नर : शिक्षकांना आता ‘शिष्यवृत्ती आमदार चषक

हेही वाचा ! पुणे : ट्रायबल फोरम ची विधानसभा उपाध्यक्षांकडे महत्वपूर्ण मागणी

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय