Wednesday, April 24, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजना निधी संदर्भात डीवायएफआयचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजना निधी संदर्भात डीवायएफआयचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

परभणी : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेकडून भारत सरकार शिष्यवृत्ती 2020 – 21 व स्वाधार योजना निधी संदर्भात समाजकल्याण आयुक्त नांदेड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृतींशी निगडित बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना 2020-21ची भारत सरकार शिष्यवृत्ती अजून मिळालेली नाही, 2021 व 22 चा टप्पा त्यांना मिळालेला असून मागच्या वर्षीची शिष्यवृत्ती अजून मिळाली नाही. काही महाविद्यालयांनी त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेतले आहे जर ती शिष्यवृत्ती त्यांना मिळाली नाही तर त्यांना फी स्वतः भरावी लागेल. आधीच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या त्या महाविद्याल्याची फीस कशी भरायची? म्हणून 2021 चा टप्पा लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावा. अनुसूचित जातीतील व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना मिळत असलेली स्वाधार योजनेची रक्कम सुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाही. बहुतांश विद्यार्थी पात्र असूनही निधी अभावी त्यांना याचा लाभ मिळालेला नाही.

या मागण्यांवर १० दिवसांत पूर्ण न झाल्यास प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर डीवायएफआय राज्यसहसचिव नसीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष अमन जोंधळे, जिल्हा कोषाध्यक्ष जय एंगडे, अमोल पट्टेकर, सचिन जोगदंड, महेंद्र पंडित, नागेश गायकवाड़, अजय मोरे, प्रज्ञा डोंगरे, आम्रपाली कांबळे, स्वप्नील सोनवणे, अक्षय काळे व नागेश ढवळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय