Thursday, January 16, 2025
HomeNewsपुणे : संथगती विकासकामामुळे धुळीचे प्रदूषण, वाहतूक कोंडी, आरोग्याच्या समस्या; प्रशासन कामाची...

पुणे : संथगती विकासकामामुळे धुळीचे प्रदूषण, वाहतूक कोंडी, आरोग्याच्या समस्या; प्रशासन कामाची कालमर्यादा ठरवणार का ?

पिंपरी चिंचवड : थेरगाव डांगेचौक मंगल नगर येथील बायपास वाकड मेनरोड वर गेले वर्षभर स्टॉर्म वॉटर आणि सांडपाणी च्या नव्या पाईपलाईन कामे सुरू आहेत. वाकड, थेरगाव हा शहरातील सर्वात मोठा वर्दळीचा परिसर आहे. येथून चिंचवड, पुणे शहर, हिंजवडी, माण येथे नोकरदार आणि प्रवासी जात येत असतात.

मंगलनगर येथील मुख्य रास्ता एका बाजूने खोदाईमुळे गेले काही महिने रहदारी साठी बंद आहे. मोठ्या पाईपलाईन येथे रस्त्यावर आहेत.

येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश कणकधर, अभी टेकाळे म्हणाले की, संपूर्ण डांगेचौक, मंगलनगर इ रहिवासी क्षेत्रात प्रलंबित आणि संथगती कामामुळे येथे धुळीचे प्रदूषण आहे. लोकांच्या घरात धूळ आहे, श्वासातून पण धूळ आहे. वाहतूक कोंडी आणि वाहनाच्या गर्दीमुळे कार्बन पसरला आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते सतिश मंडलिक, निशात दळवी म्हणाले की, स्मार्टसिटीची कामे किती मुदतीत झाली पाहिजेत, याचा प्रशासनाने विचार करावा. रस्त्यावर खोदाई मुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विकासकामांचे नियोजन नाही. गेली काही वर्षे स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त रस्त्याचीच कामे होत आहेत. पुरेसा पाणी पुरवठा आणि आरोग्य सेवेकडे मनपाचे लक्ष नाही. आम्ही रहिवासी या कामामुळे त्रस्त आहोत.

युवराज निर्मळ यांनी सांगितले की, एकाच वेळी सर्व विकासकामे सुरू झाल्यामुळे संपूर्ण दळणवळण ठप्प होतेय. शहरातील लांबपल्ल्याच्या प्रवासाला जाण्यासाठी बंगलोर हायवे बायपास कडे जाणाऱ्या वाहनांनामुळे येथील कोंडी वाढत आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय