---Advertisement---
सोलापूर : कोरोना काळात सर्व आशा व गटप्रवर्तकांना ३०० रुपये प्रतिदिन कामाचा मोबदला देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक फेडरेशन वतीने आरोग्यमंत्र्यांना निवेदनद्वारे करण्यात आली.
---Advertisement---
आरोग्य मंत्री राजेश टोपे सोलापूर दौऱ्यावर आले असताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत आपले प्रश्न मांडले, यावेळी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासित केले. यावेळी महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे सलिम पटेल, पुष्पा पाटील आदीसह उपस्थित होते.