Saturday, December 7, 2024
Homeराज्यकृष्णेच्या रौद्र रुपामुळे अथणीतील शेती आणि घरे पाण्याखाली

कृष्णेच्या रौद्र रुपामुळे अथणीतील शेती आणि घरे पाण्याखाली

अथणी (महानतेश विजापूर) : पश्चिम महाराष्ट्रातील पावसानंतर बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पुराचे पाणी शिरले आहे. कोयना धरण, सांगली, सातारा येथील तुफानी पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीत धरणाच्या पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला आहे.

मात्र कर्नाटकात पुरेसा पाऊस नव्हता. कुरची, जमखंडी, हारूगिरीरायबाग, अथणी, चिकोडी, मांजरी या बेळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील अनेक गावामध्ये पाऊस नसतानाही पुराच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

अथणी तालुक्यातील कृष्णेच्या तीराकाठी असलेल्या अनेक गावातील घरामध्ये आणि शेतामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनाने शेकडो नागरिकांची सुरक्षित ठिकाणी रवानगी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तुफानी पावसामुळे कमी पर्जन्य असलेल्या गोकाक, बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील पाण्याची कमतरता जाणणार नाही. गेल्या आठवडाभर सुरू असलेला कृष्णा, कोयना खोऱ्यातील पाऊस थांबलेला आहे. हळू हळू कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बंद असलेली परिवहन सेवा सुरू होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय