Thursday, May 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

भारतीय हद्दीत पुन्हा ड्रोन, सैनिकांनी गोळीबार करून परतावले

---Advertisement---

जम्मू : आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून शुक्रवारी भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या टेहळणी ड्रोनवर सीमा सुरक्षा दलाने गोळीबार करून त्यास सीमेपलीकडे परतवून लावले.

---Advertisement---

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्णिया क्षेत्रात शुक्रवारी पहाटे ४.२५ वाजता ड्रोन दिसले. त्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करताच जवानांनी गोळीबार केला. त्यामुळे ते पुन्हा पाकिस्तानी हद्दीत परत गेले, असे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. सीमा भागाची टेहळणी करण्यासाठी हे ड्रोन आले होते. परंतु जम्मूतील हवाई दलाच्या तळावरील गेल्या रविवारच्या ड्रोन हल्ल्यानंतर जवान सतर्क होते. त्या वेळी दोन ड्रोन विमानांनी बॉम्बस्फोट घडवले होते.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केल्याची ही पहिलीच घटना होती. त्यानंतर ड्रोन सोमवारी लष्करी आस्थापनांसह काही भागात घिरटय़ा घालत होते. मंगळवार आणि बुधवारीही असेच प्रकार घडले होते. पण जवानांनी गोळीबार करून त्यांना परतवले होते.

दरम्यान, लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी असे म्हटले होते, की ड्रोन सहज उपलब्ध होऊ लागल्याने असे प्रकार घडत आहेत. एखादा देश आणि दहशतवादीही त्यांचा गैरवापर करू शकतात.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles