Friday, March 29, 2024
Homeजुन्नरडॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जुन्नर : तांबे (ता. जुन्नर) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्व.रमेश किसन शिंगोटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. त्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन इ.शैक्षणिक साहित्याचे वाटप संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रसाद शिंगोटे आणि संचालिका डॉ.मोनिका शिंगोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विषयक एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेविषयी माहिती आरोग्य मित्र पूनम लोखंडे यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विकास चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अक्षदा बांबळे, विकास मडके, माजी मुख्याध्यापक बा.सो.मडके, अनिल मिंढे, एकनाथ पानसरे, शिवाजी मडके, तानाजी मिंढे, विनोद भागवत, राजाराम मिंढे, संजय मिंढे, दिव्या बांबळे, स्नेहा भारती, तेजल गभाले, पूनम लोखंडे, नाजुका गवारी आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक शांताराम फाफाळे, शिक्षक अरुण मातेले, हेमंतकुमार नागरे, लिपिक मिरा विश्वासराव, शिक्षकेतर कर्मचारी विठ्ठल गायकर, संजया मिंढे, प्रेमलाल बोरकर उपस्थित होते.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय