Thursday, April 25, 2024
Homeग्रामीणजुन्नर : डॉ. सदानंद राऊत यांना पद्मश्री पुरस्कार मिळण्यासाठी पंचायत समितीची शिफारस

जुन्नर : डॉ. सदानंद राऊत यांना पद्मश्री पुरस्कार मिळण्यासाठी पंचायत समितीची शिफारस

जुन्नर : नारायणगाव येथील विघ्नहर मेडिकल फाउंडेशन हॉस्पिटलचे डॉ. सदानंद राऊत यांना पद्मश्री पुरस्कार मिळण्याबाबतचा ठराव जुन्नर पंचायत समितीच्या मासिक सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.

डॉ. सदानंद राऊत व पल्लवी राऊत हे नारायणगाव येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांची गरज ओळखून १९९८ पासून ग्रामीण अतिदक्षता विभागाची त्यांनी स्थापना केली. डॉ. राऊत यांनी हृदय विकार, सर्पदंश, विषबाधा, अपघात झालेल्या हजारो रुग्णांना जीवदान दिले आहे. विशेषता सर्पदंश झालेल्या पाच हजारापेक्षा जास्त रुग्णांवर त्यांनी उपचार केले असून त्यांच्या या कार्याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने सर्पदंश तज्ञ समितीवर त्यांची निवड केली आहे. महापूर, प्रलय, भूकंप आदी राष्ट्रीय आपत्तीच्या वेळ देशभरात जाऊन वैद्यकीय सेवा त्यांनी दिली आहे. कुपोषण आणि रक्तक्षय निर्मूलनात त्यांचा सहभाग सातत्याने असतो मंचर येथील शासकीय रुग्णालयात गेली पंधरा वर्षे ते मोफत वैद्यकीय सेवा देत आहेत. तसेच, जनजागृतीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अंधश्रद्धा निर्मूलनास मदत केली आहे. या संबंधीचा ठराव जुन्नर पंचायत समितीच्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांनी मांडला तर या ठरावाला अनघा घोडके यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले.

दरम्यान, डॉ. सदानंद राऊत यांच्या कार्याची दखल घेत त्यांना जुन्नरचा मनाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा शिवनेरी भूषण पुरस्काराने देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय