Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याDr Harsh Vardhan : भाजपला आणखी एका बड्या नेत्याचा रामराम

Dr Harsh Vardhan : भाजपला आणखी एका बड्या नेत्याचा रामराम

Dr Harsh Vardhan : भारतीय जनता पक्षाने नुकतीच आगामी लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. लोकसभेच्या पहिल्या यादीत अनेक बड्या नेत्यांचं तिकीट कापण्यात आल्यापासून काही दिग्गज नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात असलेले माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे तिकीट कापण्यात आले आहे. यानंतर डॉ. हर्ष वर्धन यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. हर्ष वर्धन यांनी सोशल मीडिया “एक्स” वर पोस्ट लिहित राजकारणातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे.

डॉ. हर्ष वर्धन यांनी ‘एक्स’ वर लिहिले आहे की, ‘गेल्या तीस वर्षांपासून राजकारणात असताना पाच वेळा विधानसभा आणि दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली. या निवडणुकीत मोठ्या फरकाच्या मताने जिंकलो. पक्षाच्या विविध पदावरही काम केलं’.

पन्नास वर्षांपूर्वी कानपूरमधील जीएसवीएम मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस करण्यासाठी प्रवेश केला. तेव्हा मानव जातीसाठी सेवा करण्याचं माझं ध्येय होतं. आताही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा करण्याचा मानस आहे. राजकारणात मला गरीबी, रोग आणि अज्ञानतेशी लढण्याची संधी मिळाली, असं ते म्हणाले.

’30 वर्षांच्या राजकीय करिअरनंतर पुन्हा मूळ करिअरकडे वळू इच्छित आहे. कृष्णनगरमधील क्लिनिक माझी वाट पाहतंय, असही ते म्हणाले.

डॉ. हर्ष वर्धन हे संसदेत चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे.

दरम्यान, हर्षवर्धन यांच्या जागी प्रवीण खंडेवाल यांना तिकीट चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय