Tuesday, April 23, 2024
Homeराज्यसिटू च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी डॉ. डी. एल. कराड यांची निवड, तर...

सिटू च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी डॉ. डी. एल. कराड यांची निवड, तर महाराष्ट्रातील “यांची” कमिटी वर निवड

कर्नाटक : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन चे १७ वे अखिल भारतीय अधिवेशन १८ जानेवारी ते २२ जानेवारी रोजी बंगलोर येथे संपन्न झाले. या अधिवेशनात अध्यक्षा पदी कॉ. के. हेमलता , तर महासचिवपदी कॉ. तपनसेन, तसेच  कोषाध्यक्ष 

कॉ. साई बाबू यांची एकमताने निवड करण्यात आली.

तसेच महाराष्ट्र सिटू चे अध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, तर एम. एच. शेख, डॉ. विवेक मोन्टेरो, शुभा शमीम यांची वर्कींग कमिटी वर निवड करण्यात आली. तसेच कॉ. नलिनी कलबुर्गी यांची वर्कींग कमिटीच्या निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तर माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, के. आर‌. रघु, भरमा कांबळे, सीताराम ठोंबरे, युसूफ मेजर यांची जनरल कौंसिल वर निवड करण्यात आली. याशिवाय जनरल कौंसिल च्या 2 जागा महाराष्ट्रासाठी रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

तर किरण मोघे यांची सिटू सेंटर च्या वतीने घर कामगारांचे प्रतिनिधी म्हणून वर्कींग कमिटीवर निवड करण्यात आली. तसेच मनोज यादव यांची नाविक फेडरशन चे प्रतिनिधी म्हणून जनरल कौंसिल सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय