Friday, March 29, 2024
Homeशिक्षणबीड : मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे -...

बीड : मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे – अविनाश धायगुडे

बीड : मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अविनाश धायगुडे यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोविड -19 या साथीचा प्रादुर्भाव अद्यापही कमी होताना दिसत नाही. कोरोनामुळे आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेच्या संपूर्ण जीवनावरच विपरीत परिणाम झाला आहे. असाच परिणाम विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर झाला आहे. विद्यापीठात शिक्षण घेणारे बहुतेक सर्वच विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात. कोविडमुळे संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. गरिबांचे जगणे अवघड झाले आहे. असे असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांकडून सक्तीने परीक्षा शुल्क वसूल करत असल्याचा आरोप  धायगुडे यांनी केला आहे.

धायगुडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठ प्रशासन असंवेदशीलतेचे प्रदर्शन करत आहे. मागच्या सत्राची परीक्षा फी घेत असताना शिक्षणमंत्री यांनी ‘ही फी विद्यार्थ्यांना परत दिली जाईल किंवा पुढच्या सत्राची फी म्हणून गृहीत धरली जाईल’ असे सांगितले होते. मात्र आपल्या या वचनाचा विद्यापीठाला ही विसर पडलेला दिसतो. म्हणूनच आम्ही आपल्याला या निवेदनाद्वारे ही आठवण करून देत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय