मुंबई : आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. या सर्व प्रश्नांवर त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी आशाही खा. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
---Advertisement---
यामध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला केंद्राची मंजुरी मिळावी, शिवनेरी ते वढु बु. यांना जोडणाऱ्या शिव-शंभू कॉरिडॉरला मंजुरी मिळावी, शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज लावावा, मतदारसंघातील विकासकामांवरील स्थगिती उठवावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
