मुंबई : मुंबईतील भव्यदिव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदूमिलमधील स्मारक केव्हा होणार, याकडे देशातील साऱ्या लोकांचे लक्ष लागले आहे. या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला होता.
भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन !
त्यानंतर या स्मारकाच्या कामाची पाहणी महाविकास विकास आघाडीतील वरिष्ठ नेते, मंत्र्यांनी वेळोवेळी जाऊन केली होती. या इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे अत्याधुनिक स्मारक २०२३ अखेरपर्यंत किंवा २०२४ सालच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाईल , असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर केले.
सोलापूर जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी भरती, 20 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख
धनंजय मुंडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची वाट संपूर्ण देश पाहतोय. २०२३ अखेरीस किंवा २०२४ सुरुवातीपर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण होईल. त्याचे लवकर लोकार्पण होईल, या उद्देशाने जलद गतीने काम सुरू ठेवले आहे, अशी माहिती यावेळी मुंडे यांनी दिली. ‘ज्या स्तंभावर स्मारक होणार आहे, त्या स्तंभाचे काम ७५ फुटापर्यंत पूर्ण झाले आहे. त्याचे आणखी २५ फुटाचे काम बाकी आहे. स्मारकापर्यंत जाण्यासाठी किती प्रदक्षिणा घालायाची आहे, त्या रचनेचं काम बाकी आहे. तसेच एक हजार लोकांची क्षमता असलेल्या वातानुकूलित सभागृहाचं काम सुद्धा सुरू आहे. तळाला पार्कींगचे काम देखील सुरू आहे. या स्मारकासाठी पैशाची कुठलीही अडचण येणार नाही’, असेही मुंडे यांनी सांगतिले.
अन्न कचऱ्यापासून निर्मित वीजेवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करण्याचा देशातील पहिला मान मुंबईला !
रेल्वे माहिती प्रणाली केंद्रात 150 रिक्त जागांसाठी भरती, असा करा अर्ज !