Saturday, January 28, 2023
HomeNewsकेलेले उपकार विसरू नका, अहंकार बाळगू नका-सिनेअभिनेता जॅकी श्रॉफ

केलेले उपकार विसरू नका, अहंकार बाळगू नका-सिनेअभिनेता जॅकी श्रॉफ

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
चांदखेड येथे रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या वतीने चांदखेडमधील जे ग्रामस्थ चुलीवर अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वयंपाक करतात. धुरामुळे महिलांना विविध आजार होतात, अशांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी धुरापासून संरक्षण देणारे बायोगॅस कीट व इतर साहित्याचे ‘हॅपी फॅमिली कीट’चे मोफत वाटप सिनेअभिनेता जॅकी श्रॉफ व सिनेअभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा रो. योगिता वैशंमपायन, सचिव रो. रागिनी शहा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व माजी अध्यक्ष अ‍ॅड. रो. विजय शहा, माजी प्रान्तपाल रो. पंकज शहा, चांदखेडच्या सरपंच मीना माळी, माजी सरपंच व रोटरी क्लबचे ग्रामसभा नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष बांदल आदी उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या वतीने जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते संतोष बांदल यांना ग्रामसभा अध्यक्षपदी नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

सिनेअभिनेता जॉकी श्रॉफ पुढे म्हणाले, रोटरी क्लब मार्फत गावागावात आरोग्य जागृतीचे अभियान राबवा. प्रत्येकाने सकाळी योगासन करून आपले कुटुंबियांचे आरोग्य विषयक काळजी घ्यावी, घरात स्वच्छता ठेवा, आपण केलेल्या कामाचा व कार्याचा अहंकार बाळगू नका, वंचितांना मदतीसाठी पुढे या.आज गरजू महिलांना हॅपी फॅमिली कीट देवून क्लबने स्त्युत्य उपक्रम राबविला आहे. एड्स या गंभीर रोगापासून बचाव करण्यासाठी लग्न होणार्‍या युवा-युवतीने लग्नापूर्वी आधीच चाचणी करा, जेणेकरून लग्नानंतर होणार्‍या आपत्याला त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. याचा गावागावात प्रचार व प्रसार रोटरी क्लब व चांदखेड सरपंच आदी जागरूक नागरीकांनी करावा. ग्रामस्थांना म्हणाले घर जसे स्वच्छ ठेवता, तसे मन ही स्वच्छ ठेवा, आपापसात वैर ठेवू नका, कोणत्याही प्रसंगाला सामुहीक सामोरे जाण्याचा प्रयत्न करावा.
यावेळी सिनेअभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांनी सांगितले. प्रत्येकजण हिरो आहे, सिने निर्माता सुभाष घई यांनी संधी दिली ते आमचे प्रेरणास्थानच आहे.

प्रास्ताविकात रोटरीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.रो. विजय शहा म्हणाले, ग्रामस्थांच्या अडीअडचणी मदत, आरोग्य वृक्ष वाटप आदी उपक्रमे रोटरी क्लब मार्फत गेली अनेक वर्षे कार्यरत आहोत. या परिसरात शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने वास्तव्य करीत असून शेतीला पाणी मिळावे, यासाठी ओढ्यातील गाळ काढून त्याची खोली वाढली आहे. पाणीदेखील मुबलक आहे, याचा आम्हालाही विशेष आनंद होत आहे.यावेळी माजी प्रांतपाल रो. पंकज शहा यांनी रोटरी क्लबची सविस्तर माहिती विशद केली. चांदखेडच्या सरपंच मीना माळी यांनी रोटरी क्लबचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. मोशमी शहा यांनी केले, तर आभार रो. रागिनी शहा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे प्रशांत शहा, रोटरी ग्रामस्थ सभेचे संतोष गायकवाड, ज्योती केकळे, प्रमोद गायकवाड, संतोष आगळे, दत्ता पानसरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

लोकप्रिय