Thursday, April 25, 2024
HomeNewsकॅन्सरला हरवून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसा मध्ये दाखल !

कॅन्सरला हरवून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसा मध्ये दाखल !

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम हेमलकसाचे आदिवासी उत्थानासाठी उभारलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर प्रकाश आमटे तीन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर प्रकल्पात परतले.
यावेळी बिरादरीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यंदाच्या जून महिन्यात पुणे प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

चाचण्यादरम्यान त्यांना कर्करोगाचे निष्पन्न झाल्यानंतर मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू केले होते. याच दरम्यान उपचार कक्षात फिरत असताना कोसळल्याने त्यांचे हाताच्या हाड देखील मोडले होते. या दोन्ही संकटांवर मात करत डॉक्टर प्रकाश आमटे दीर्घ कालावधीनंतर लोक बिरादरी प्रकल्पात परतताच डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांचे प्रकल्पातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीमच्या तालावर जल्लोषात स्वागत केले.

यावेळी 650 विध्यार्थी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर प्रकाश यांनी देखील प्रकल्पातील कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. या कठीण समयी प्रकल्प आणि आमटे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्वांचे आमटे कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले आहेत. डॉक्टर प्रकाश यांना थकवा जाणवत असून काही दिवसात ते आपली दैनंदिनी सुरू करतील अशी माहिती प्रकल्पाच्या वतीने देण्यात आली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय