भारतामध्ये उपवास आणि साबुदाणाची खिचडी यांचे एक अतूट नाते आहे. सर्वसामान्यपणे उपवासासाठी साबुदाणा पासून तयार केलेल्या पदार्थांना पहिली पसंती दिली जाते. साबुदाणा काही प्रमाणात जरी शरीरासाठी चांगला असला तरी त्यापासून होणारे दुष्परिणाम हे अधिक आहेत. अशाने शरीराला अपाय निर्माण होऊन धोका निर्माण होऊ शकतो. साबुदाणा खाल्ल्याने शरीरावर ती काय परिणाम होतात ते पाहूयात.
साबुदाण्याचे अतिप्रमाणात सेवन करणाऱ्यांमध्ये लठ्ठपणाची लक्षणे आढळून आली आहेत. साबुदाणे मध्ये मोठ्या प्रमाणात चरबी आणि प्रथिने असल्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवते.
साबुदाण्या मध्ये ग्लायसेमिक इंडेक्स नसतो. त्याचे दररोज सेवन केले तर रक्तातील साखरेची पातळी वाढून ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांना अपाय निर्माण होऊ शकतो.
साबुदाणा मध्ये कॅल्शियम चे प्रमाण असल्यामुळे मुतखडा होऊ शकतो. तसेच साबुदाण्या मध्ये सायनाईड चे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले असले तरीही अतिसेवनाने त्याच्या मेंदू वरती वाईट परिणाम होऊ शकतो.
अतिरिक्त चरबी असलेला साबुदाणा हृदयरोगाचा धोका कित्येक पटीने वाढतो .अशावेळी हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याचे प्रकारही होऊ शकतात.
पित्ताचा तसेच पोटात जळजळीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी साबुदाणा पासून दूरच राहावे पोटाचे आजार असणाऱ्यांसाठी साबुदाणा कटकट ठरू शकतो .
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच आहे .त्यामुळे गरजे एवढाच साबुदाणा खाल्ला तर आरोग्य नियमित व संतुलित राहील यात शंका नाही.