Tuesday, November 5, 2024
Homeराज्यप्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच...

प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी

Photo credit : drbeckermeyer.com

पुणे : वैयक्तिक जीवनशैली आणि कामामुळे आता लोकांकडे एकमेकांसाठी कमी वेळ आहे. यामुळे जोडप्यांमधील अंतर वाढू शकते. कामामुळे जोडीदाराला वेळ देता येत नसेल तर आपापसात भांडण आणि वेगळे होण्याची शक्यता वाढते.

ज्या प्रेमासाठी तुम्ही एकत्र नातं सुरु केलं ते तुमच्या चुकांमुळे तुटायला लागतं. व्यस्त जीवनात वेळ मिळणे कठीण आहे. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दिवस घालवू शकत नसाल किंवा तुम्ही बरेच दिवस बोलू शकत नसाल, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोज काही गोष्टी सहज करू शकता. यामुळे तुमचे नाते मजबूत होईल आणि संपूर्ण दिवस प्रेमाने जाईल. नात्याची ताकद वाढवण्यासाठी आणि प्रेम टिकवण्यासाठी प्रत्येक जोडप्याने या गोष्टी कराव्यात. 

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

प्रत्येक जोगीदाराने समजूतदारपणाची भूमिका घेतली पाहिजे. सहजीवनाच्या आनंदीमय प्रवासासाठी आपण या बाबींचा काटक्षाने अवलंब करा, निश्चित फायदा होईल.

■ सकाळी उठल्याबरोबर एकमेकांना शुभेच्छा द्या : 

आपल्या दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर एकमेकांना सकाळच्या शुभेच्छा देण्याची सवय लावली पाहिजे. जेव्हा तुमचा जोडीदार उठल्याबरोबर तुमच्याकडे पाहून हसतो आणि दिवसाच्या शुभेच्छा देतो तेव्हा तुम्हालाही बरे वाटते. संपूर्ण दिवस फ्रेश मूडमध्ये घालवाल. म्हणून रोज सकाळी एकमेकांना प्रेमाने शुभेच्छा द्या. तुमचा दिवस आनंदी जाईल.

चला तर समजून घेऊ – मासिक पाळी

■ एकत्र नाश्ता करा : 

कदाचित कामामुळे आपण दिवसभर आपल्या जोडीदाराशी बोलू शकत नाही आणि संध्याकाळी कामाच्या थकव्यामुळे आपण त्यांच्याशी नीट बोलू शकत नाही. किंवा तुम्ही दोघे दुपारचे आणि रात्रीचे जेवण एकत्र घेऊ शकत नाही. परंतु सकाळचा नाश्ता तुम्हाला नेहमी एकमेकांच्या जवळ ठेवेल. जर तुमचा जोडीदार नेहमी न्याहारी करत असेल तर काही वेळा तुम्ही सकाळचा चहा किंवा कॉफी करून त्यांना आश्चर्यचकित करू शकता. 

तुम्ही किचनमध्ये एकत्र उभे राहून नाश्ता बनवताना थोडा वेळ घालवू शकता. एकत्र घालवलेला थोडा वेळ देखील या जोडप्यामधील प्रेम कमी होऊ देत नाही.

बँक ऑफ बडोदा येथे 220 जागांसाठी भरती !

■ कामाची प्रशंसा करा : 

कौतुक ऐकून सर्वांनाच आनंद होतो. दुसरीकडे जर तुमच्या जोडीदाराने तुमची प्रशंसा केली तर प्रेम अधिक वाढते. तुम्ही तुमच्या जोडीदाराची वेळोवेळी प्रशंसा केली पाहिजे. अशा परिस्थितीत त्यांना असे वाटेल की तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता. 

त्यांच्या दिसण्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांच्या कामाची, व्यक्तिमत्त्वाची, कोणत्याही गोष्टीची प्रशंसा करू शकता.

ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला !

■ सकाळची सुरुवात हसून करा : 

सकाळी तुमचा मूड चांगला असेल तर तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा दिवस खूप छान जाईल. त्यामुळे रात्रीच्या चांगल्या झोपेने भूतकाळातील गोष्टी विसरून नवीन सकाळची सुरुवात मजेशीर विनोदाने करा. एकमेकांना आनंद देण्यासाठी किंवा हसण्यासाठी विनोद सांगा. यामुळे तुमच्या पार्टनरचा मूड चांगला राहतो. तो कामाचा ताण किंवा इतर तणावातून बाहेर पडतो आणि तुमच्याशीही चांगला वागतो.

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

संबंधित लेख

लोकप्रिय