चेन्नई : तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने डीएमकेच्या बाजूने निकाल दिला आहे. एम के स्टेलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमकेने मोठे यश मिळवले असून बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या अण्णाद्रमुकला विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे.
डीएमकेने १२५ जागांवर दणदणीत विजय मिळवला असून तामिळनाडूतील डीएमकेच्या विजयाबरोबर राज्याला एम. के. स्टॅलिन यांच्या रूपात नवे राजकीय नेतृत्व मिळाले असल्याची चर्चा देखील होताना दिसत आहे. तर अण्णाद्रमुकला ६५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या २०२१
डीएमके (DMK) १२५
अण्णाद्रमुक (AIADMK) ६५
काँग्रेस (INC) १८
भाजप (BJP) ४
व्हीसीके (VCK) ४
पीएमके (PMK) ५
एमडीएमके (MDMK) ४
सीपीआयएम (CPIM) २
सीपीआय (CPI) २
इतर १
२०१६ मध्ये कुणाच्या किती जागा होत्या
डीएमके (DMK) ८९
अण्णाद्रमुक (AIADMK) १३६
काँग्रेस (INC) ८
अधिक वाचा
केरळमध्ये भाजपचे खाते बंद ; पिनराई विजयन यांनी करून दाखवलं
केरळ मध्ये पुन्हा डावे ; पिनराई विजयन यांनी घडवला इतिहास