Monday, September 16, 2024
Homeजिल्हाआमगाव येथे एसएफआय व डीवायएफआयचे जिल्हा अभ्यास शिबीर संपन्न

आमगाव येथे एसएफआय व डीवायएफआयचे जिल्हा अभ्यास शिबीर संपन्न

नागपूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया – डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, नागपूर जिल्हा कमिटी आयोजित अभ्यास शिबीर, आमगाव, रामटेक तालुका, जि.नागपूर येथे 2 व 3 जून रोजी संपन्न झाले.

शिबिराचे उदघाटन शेतमजूर युनियन चे जिल्हाध्यक्ष भीमराव गोंडाने यांनी केले. त्यानंतर पहिल्या सत्रात स्वातंत्र्य नंतरचा भारत या विषयावरील मांडणी डी.वाय.एफ.आय. चे माजी केंद्रीय कमिटी सदस्य अरुण लाटकर यांनी केली. या सत्राचा अध्यक्षस्थानी संदेश रामटेके होते. यानंतर दुसऱ्या सत्रात गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला यात सर्वानी सामूहिक गीत गायले. या सत्रात संदेश मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच, शिबिराचा शेवटचा सत्र 3 जून ला सकाळी नागार्जुन च्या टेकडीवर ट्रेकिंग करून सकाळी 9 वाजता संपला.

या सत्राचे नेतृत्व उमेश तुमडाम यांनी केले. शिबिराचे सूत्रसंचालन अमित हटवार यांनी केले तर शिबिरात डी.वाय.एफ.आय. चे जिल्हा सचिव कृनाल सावंत व एस.एफ.आय. चे सचिव एल.राम, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच चे मोंटू सराटे प्रामुख्याने उपस्थित झाले.

शिबिरात 25 प्रतिनिधीनी सहभाग घेतला. शिबिराला यशस्वी करण्यासाठी अमित हटवार, संदेश रामटेके, संघर्ष हटवार,राम,सुरज डुंडे,उमेश तुमडाम,संदेश मेश्राम,वैष्णवी टेकाम, कल्पना हटवार,रोहन नागपुरे, आदित्य नेवारे, गुलशन रेहकवार,सुमित कंगाली, राजू हटवार,भीमराव गोंडाने आदींनी परिश्रम घेतले.

 हे ही वाचा :

राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडेसह हे आहेत अधिकारी!

दहावीचा निकाल लागला, कोकण अव्वल तर “हा” विभाग सर्वात कमी

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

 नोकरीच्या बातम्या : 

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय