Tuesday, July 2, 2024
Homeजुन्नरJunnar : उच्छिल शाळेत विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप

Junnar : उच्छिल शाळेत विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप

जुन्नर / आनंद कांबळे : उर्मी संस्था पुणे, AFINITY X, दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान पुणे यांच्या मार्फत आदिवासी भागातील विविध शाळांमध्ये साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्याचे वाटप बीटच्या वतीने उच्छिल येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Junnar)

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष जाधव अफिनिटी एक्स समन्वयक पुणे हे होते. तर शिक्षण विभागाच्या वतीने प्रमुख उपस्थिती बीट विस्तार अधिकारीसंचिता अभंग ह्या होत्या व उर्मी फाऊंडेशन पुणे यांचे राहूल शेंडे व एफिनिटी एक्सचे संतोष जाधव हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार संजय डुंबरे आणि संतोष जाधव यांच्या माध्यमातून उच्छिल केंद्रातील 9 शाळा व इंगळून केंद्रातील 6 शाळांना साहित्य देण्यात आले.

या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या,ड्रॉइंग बूक, साहित्य कीट, कंपास, पेन, रंगपेटी असे उत्तम दर्जाचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित मोहित शेट्टी, ललित बोंडे, सायली फडके, भारती शेट्टी इत्यादी प्रमुख मान्यवरांची संस्थेच्या वतीने उपस्थिती होती. (Junnar)

मनोगतात आपले विचार मांडताना संचिता अभंग यांनी सांगितले की, या संस्थेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात सन 2016 पासून दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना अनेक शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येत आहे. आज 4500 हजार विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले असून या कार्यक्रमाची दख्खल पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयजी नाईकडे यांच्या संकल्पनेतून आदिवासी पश्चिम भागातील, दुर्गम होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य विविध संस्थांच्या माध्यमातून तथा लोकसहभागातून देण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आणि या संकल्पनेला प्रतिसाद देत आज या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यांचा वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने गटशिक्षणाधिकारी सौ अनिता शिंदे व शिक्षणाधिकारी महोदय यांनी देखील या कार्यक्रमाच्या शुभेच्छा व संस्थेचे आभार व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वच मान्यवरांनी शाळेविषयी गौरवोद्गार काढले. व संस्थेला पुढील काळात असेच शैक्षणिक साहित्य आमच्या या भागातील मुलांना द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सर्व मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. यावेळी बीटमधील 33 शाळामध्ये साहित्य वाटप सुराळे व उच्छिल येथे कार्यक्रम घेण्यात आला.

तसेच इयत्ता पाचवी चे वर्ग असणारे उच्छिल, आंबोली व इंगळून या तिन्ही शाळांना व्ही. डी. पानसरे मा. मुख्याध्यापक शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर यांच्या वतीने शिष्यवृतीचे यशोदिप प्रकाशनाचे 3 संच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पलता पानसरे यांनी संबंधित शिक्षक व विद्यार्थी यांना दिले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थिती व शुभेच्छा सुरेश भवारी केंद्रप्रमुख तांबे, पुष्पलता पानसरे केंद्रप्रमुख उच्छिल इंगळून व यांच्यासह या कार्यक्रमाचे नियोजन खंडेराव ढोबळे सरचिटणीस पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, रमाकांत कवडे अध्यक्ष जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ, संतोष पाडेकर सभापती जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था हे होते. (Junnar)

उच्छिल शाळेचे शालेय समिती अध्यक्ष सचिन नवले, अध्यक्ष शरद नवले शालेय व्यवस्थापन समिती सदस्य शिवाजी नवले, सदस्या कांचन नवले तसेच श्रीम.हिराबाई नवले, विमल करवंदे यांच्यासह आदी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंगळून शाळेचे मुख्याध्यापक नानाभाऊ शेळकंदे, गणपत तळपे, हरिभाऊ शेळके, कैलास नागरगोजे, उच्छिल केंद्राच्या वतीने बाळासाहेब कडू, राजेंद्र खेत्री, तुळशीराम साबळे, तुकाराम भालेकर, दिपक विरणक, हेमा दिवटे हेमा सुपे, मिनाक्षी चौधरी इत्यादी दोन्ही केंद्रातील शिक्षक उपस्थित होते. आज उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते शाळेमध्ये वृक्षारोपन करण्यात आले व शाळेसाठी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन सुभाष मोहरे यांनी तर प्रास्ताविक संजय डुंबरे तर कार्यक्रमाचे संयोजन अन्वर सय्यद आणि कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन स्मिता ढोबळे, आरती मोहरे व लिलावती नांगरे यांनी केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : विराट कोहली पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माचाही मोठा निर्णय

मोठी बातमी : टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा

T20 World Cup : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

India Post : भारतीय पोस्ट मध्ये 10वी पाससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय